पॅनकार्ड सक्ती नको, सराफांचा देशव्यापी संप

February 10, 2016 8:47 AM0 commentsViews:

gold_marketनवी दिल्ली – 10 फेब्रुवारी : आज देशभरातला सराफा बाजार बंद राहणार आहे. केंद्र सरकारने दोन लाखवरच्या व्यवहारासाठी पॅन कार्ड अनिवार्य केलंय. त्याला विरोध म्हणून देशभरातल्या 300 पेक्षा जास्त ज्वेलर्स संघटनांनी संप पुकारला आहे.

दोन लाखांवरच्या खरेदीसाठी पॅन कार्ड अनिवार्य करण्यात आल्यामुळे ग्राहक दुरावतील अशी भीती ज्वेलर्सना वाटतेय. यामुळे अप्रत्यक्षरित्या रोजगारावरदेखील परिणाम होईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केलीये. कारण पॅन कार्ड अनिवार्य झाल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना सोने खरेदीपासून मुकावे लागेल. परिणामी, अर्थव्यवस्थेच्या साखळीला बाधा पोचण्याची शक्यता आहे. विशेषत: ग्रामीण भागातल्या किरकोळ विक्रेत्यांना फटका बसेल, असं या संघटनेचं मत आहे. पॅन कार्डची मर्यादा दोन लाखांवरून वाढवून दहा लाख रुपये करावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close