देवनार नंतर चेंम्बुर, आरसीएफ काॅलनीत अज्ञाताने पेटवला कचरा

February 10, 2016 9:20 AM0 commentsViews:

kachara3मुंबई – 10 फेब्रुवारी : मुंबईतल्या देवनार कचरा डेपोची आग शांत होत नाही तेच मंगळवारी संध्याकाळी चेंम्बुर येथील आर सी एफ कॉलनीतील कचर्‍याला भीषण आग लागली होती. सुरुवातीला छोटी असलेली ही आग नंतर वाढली. आरसीएफच्या अग्निशमक दलाने पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली आहे.

आरसीएफ कॉलनीत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत येथील रहिवासी सुट्टीच्या दिवशी कॉलनी साफ करतात. तेथील कचरा जमा करुण जवळच असलेल्या एका मोठ्या खड्यात टाकतात. हा खड्डा अंदाजे 10 फूट खोल असावा आणि त्यावर 20 फूट उंच हा पलापाचोळा असलेला कचरा जमा झाला होता. काल कोणी अज्ञात व्यक्तीने याला आग लावली. अग्निशमन दलाच्या जवानांनी 25 पाण्याचे टँकरच्या मदतीने रात्री 11 वाजता ही आग आटोक्यात आणली, या आगीत जवळपासच्या झाडाना सुद्धा नुकसान झाले.सुदैवाने यात कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नाही. हा विभाग अतिसंवेदनशील आहे. 24 तास येथे सुरक्षा रक्षक असताना हां प्रकार घडल्याने या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उभे राहते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close