समीर आणि पंकज भुजबळांची समोरासमोर चौकशीची शक्यता

February 10, 2016 9:49 AM0 commentsViews:

 sameer_&_pankaj10 फेब्रुवारी : महाराष्ट्र सदन घोटाळा आणि गैरव्यवहार प्रकरणी भुजबळ कुटुंबियांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागलाय. मंगळवारी पंकज भुजबळांच्या चौकशीनंतर आता समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांची समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी समीर भुजबळ यांना ईडीने अटक केलीये. त्यांच्या कोठडीतही वाढ करण्यात आलीये. त्यानंतर ईडीने पंकज भुजबळ यांच्याकडे मोर्चा वळवला. मुंबईतील ईडीच्या ऑफिसमध्ये काल पंकज भुजबळ हजर झाले. तब्बल 8 तास ईडीने त्यांची कसून चौकशी केली. समीर आणि पंकज भुजबळ हे दोघेही अनेक कंपन्याचे संचालक असून दोघांनी हवालामार्फत गैरव्यवहार केल्याचा संशय ईडीला आहे. परदेशात बेकायदेशीरपणे व्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर असून कर बुडवण्याचा संशयही त्यांच्यावर आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ अखेर काल अमेरिकेतून मुंबईत परतले. त्यांनी नरिमन पॉइंटच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यलयात पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरच्या आरोपांचं खंडन केलं. आपण सर्व कायदेशीर प्रक्रियांना सामोरं जायला तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच ईडीची कारवाई आकसाने होत असल्याचा आरोप त्यांनी केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close