भूमाता ब्रिगेडमध्ये उभी फूट, महिला कार्यकर्त्यांनी मांडली वेगळी चूल

February 10, 2016 11:56 AM1 commentViews:

shani_mandir_bhumataकोल्हापूर – 10 फेब्रुवारी : शनी शिंगणापूरच्या शनीमंदिराच्या चौथर्‍यावर चढून दर्शन देण्यासाठी मैदान गाजवणार्‍या रणरागिणी भूमाता ब्रिग्रेड संघटनेत उभी फूट पडलीये. या संघटनेतील महिला कार्यकर्त्यांनी आता वेगळी चूल मांडत भूमाता स्वाभिमानी ब्रिगेड स्थापन केली.

शनिशिंगणापूर चौथर्‍यावर महिलांना प्रवेशबंदीच्या विरोधात आंदोलन केल्यामुळे भूमाता ब्रिगेड चर्चेत आली आहे. ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई या मनमानी कारभार करतात असा आरोप प्रियांका जगताप, पुष्पक केवडकर आणि दुर्वा शुक्रे यांनी केलाय. या तिघींनी आता भूमाता स्वाभिमानी ब्रिगेड या नव्या संघटनेची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे देसाई आणि जगताप या दोघींनी आपल्या पाठीमागे हजारो महिला असल्याचा दावा करत महिलांना मंदिर प्रवेश मिळण्याकरता लढत राहू अशी ग्वाही दिली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • amit

    हा हा हा १० दिवसांपूर्वी ही ब्रिगेड आणि ह्या बायका ह्यांना कोणीच ओळखत नव्हते आणि प्रसिद्धी साठी चाललेला आटापिटा दिसतोय हे कळलाय

close