वाहन विक्रीदारांनाच द्यावे लागणार ग्राहकांना 2 हेल्मेट !

February 10, 2016 12:22 PM0 commentsViews:

bike_showroom3औरंगाबाद – 10 फेब्रुवारी : राज्यभरात हेल्मेट सक्तीला सुरुवात झालीये. पण, आता हेल्मेट देण्याची जबाबदारी ही वाहन विक्री करणार्‍या शो रुमचीच असणार आहे असा आदेश परिवहन विभागाने दिलाय. वाहन विक्रीच्या वेळी ग्राहकांना 2 हेल्मेट देणे आता बंधनकारक ठरणार आहे.

राज्यात अनेक शहरांमध्ये हेल्मेट सक्ती लागू कऱण्यात आलीये. सुरुवातीला औरंगाबादमध्ये हेल्मेट सक्ती कऱण्यात आली. त्यानंतर लगेच पुण्यातही सक्ती झाली. पुण्यात हेल्मेट सक्तीला नागरिकांनी विरोध केला. पण आता परिवहन आयुक्तांनी नवीनच आदेश काढलाय. या आदेशानूसार नवीन दुचाकी वाहनविक्री करणार्‍या शो रूमवरच जबाबदारी टाकली आहे. नविन दुचाकी वाहन विक्रीच्या वेळेस दोन हेल्मेट ग्राहकांना पुरवणे बंधनकारक आहे. जर नवीन दुचाकी वाहनासोबत हेल्मेट पुरवले नाही तर त्या वाहनाची नोंदणी आरटीओमध्ये होणार नाही असं बजावण्यात आलंय. औरंगाबाद आरटीओनं सर्वप्रथम या आदेशाची अंमलबजावणीही सुरू केली आहे. त्यामुळे आता नवीन वाहन खरेदी करतांना शो रुमकडूनच हेल्मेट घ्यावे लागणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close