पाकिस्तानला हवाय कोहिनूर हिरा !

February 10, 2016 12:11 PM0 commentsViews:

kohinoor_dimandलाहोर – 10 फेब्रुवारी : एकेकाळी भारताची शान असलेल्या कोहिनूर हिर्‍यावर आता पाकिस्तानातूनही दावा सांगितला जातोय. यासाठी लाहोर कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून हिरा पाकिस्तान आणण्यात यावा अशी मागणी केलीये.

कोहिनूर हिरा ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या ताब्यात आहे. तो हिरा पाकिस्तानमध्ये आणावा यासाठी लाहोरच्या कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे, ती याचिका कोर्टाने दाखलही करून घेतलीये. बॅरिस्टर जावेद इक्बाल जाफरी यांनी ही याचिका दाखल केली आहे. स्वातंत्र्यापूर्वी कोहिनूर हिरा भारताच्या ज्या भागात होता, तो भाग आता पाकिस्तानात आहे. त्यामुळे त्यावर पाकिस्तानचा हक्क आहे, असा दावा याचिकाकर्त्यांनी केलाय. ब्रिटनची महाराणी आणि ब्रिटनचं पाकिस्तानातलं उच्चायुक्तालय यांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close