सुप्रीम कोर्टाचा राज यांना टोला

March 8, 2010 11:10 AM0 commentsViews: 3

8 फेब्रुवारीसुप्रीम कोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तडाखा दिला आहे. जोपर्यंत प्रक्षोभक भाषण थांबवणार नाही तोपर्यंत राज ठाकरे यांच्याविरुध्द केसेस फाईल होत राहणार, असे कोर्टाने म्हटले आहे.राज यांनी पाटणा आणि जमशेदपूर इथे दाखल झालेल्या केसेस दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात ट्रान्सफर करण्याची विनंती केली होती. या अगोदर 6 केसेस दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात वर्ग करण्यात आल्या. मात्र त्यानंतर जमशेदपूर, मध्यप्रदेश आणि पाटणा इथे तीन केसेस दाखल झाल्या. या केसेसही तीस हजारी कोर्टात ट्रान्सफर व्हाव्यात अशी याचिका राज ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश बालकृष्णन यांनी हे विधान केले आहे.

close