… आणि रामदास आठवले झाले मुख्यमंत्री!

February 10, 2016 3:16 PM0 commentsViews:

मुंबई – 10 फेब्रुवारी : नेहमीच पदासाठी आग्रही असणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खासदार रामदास आठवले नुकतेच मुख्यमंत्री झाले. विश्वास बसत नाही ना? आहो, पण असं खरंच झालं आहे! कन्यारत्न या आगामी मराठी सिनेमात रामदास आठवले  मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. मुंबईत आज त्याचं शुटिंग पार पडलं.

कन्यारत्न या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे हे दिग्दर्शन करत आहेत. “मुख्यमंत्र्यांच्या रोलसाठी आम्हाला चर्चेतील चेहरा हवा होता. मात्र तो चित्रपटसृष्टीतला नको होता. अशा वेळी मला रामदास आठवले या रोलसाठी योग्य आहेत असं वाटलं आणि तशी बोलणी करायची ठरवली. मात्र रामदास आठवलेंनी त्यांना आधी चित्रपटांत काम करण्याच्या ऑफर्स नाकारल्या होत्या. मात्र, चित्रपट सामाजिक विषयावर भाष्य करणारा असल्याने त्यांनी तात्काळ होकार दिला आणि आमची ऑफर स्वीकारली”, असे शिवाजी दोलताडे म्हणाले.

या चित्रपटात मिलिंद शिंदे, आदिती सारंगधर, सुरेखा कुडची, कैलास डोकला, अप्पा बोराटे, तेजा देवकर यांची प्रमुख भूमिका आहे. एप्रिलमध्ये हा चित्रपट संपूर्ण प्रदर्शित होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close