‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाडांचं सपत्नीक आंदोलन

February 10, 2016 6:24 PM0 commentsViews:

×ÝÖŸÖÃÖ´ÖÝÖæ²Ö12

मुंबई – 10 फेब्रुवारी : भटक्या विमुक्त समाजाचं दुखणं साहित्याच्या माध्यमातून जगासमोर मांडणारे ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांच्यावरच स्वत:च्या रोजीरोटीसाठी उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे.

लक्ष्मण गायकवाड यांना उदरनिर्वाहाची सोय व्हावी म्हणून काही वर्षापूर्वी मुंबईतल्या फिल्मसीटी मध्ये हॅाटेल चालवण्यासाठी जागा देण्यात आली होती. आता सरकार बदलल्याने त्यांचा करार वाढवण्यास राज्य सरकारनं नकार दिला आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांनीही त्याला नकार देत, गायकवाड यांना त्या हॉटेलमधून बाहेर काढण्यात प्रशासनानं निर्णय घेतला आहे.

अखेर आपल्या रोजीरोटीसाठी लक्ष्मण गायकवाड यांनी स्वत:ला या हॉटेलमध्ये सपत्नीक कोंडून घेतलं आहे. तसंच जर आपल्याला इथून बाहेर काढण्यासाठी जबरदस्ती केली, तर हॉटेलसह स्वत:ला उडवून देईल, अशी धमकीही दिली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close