विजयसिंह मोहिते-पाटलांच्या पुतण्याची पोलिसांना मारहाण

February 10, 2016 7:24 PM0 commentsViews:

hdfdjftdjfxdf

अकलूज – 10 फेब्रुवारी : किरकोळ कारणावरून पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना मारहाण केल्याप्रकरणी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पुतण्या सत्यशील याच्यासह त्याच्या 9 साथीदारांना आज अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अकलूज इथे काल (मंगळवारी) रात्री पोलीस वाहनातून गस्तीवर जात होते. दुसर्‍या बाजूने सत्यशील आणि त्याचे साथीदार वाहनातून येत होते. त्याचवेळी दोन्ही वाहने एकमेकांना खेटून गेली. यावरून पोलीस आणि सत्यशीलच्या साथीदारांमध्ये शाब्दिक चकमक झाली. या वादाचं मारहाणीत रूपांतर झालं. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कोरके आणि दोन पोलीस कर्मचारी त्यांच्या मदतीला गेले. त्यांनाही सत्यशील यांच्या साथीदारांनी मारहाण केली. यात काही जणं जखमीही झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सत्यशील आणि त्याच्या 9 साथीदारांना ताब्यात घेतलं असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे अकलूजमधील मोहिते पाटलांच्या गुंडागिरीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close