समीर भुजबळ यांना अटक का झाली?, IBN लोकमतकडे ‘ईडी’चा रिमांड अर्ज

February 10, 2016 10:00 PM0 commentsViews:

sameer bhujbal

मुंबई – 10 फेब्रुवारी : समीर भुजबळांविरोधातला रिमांड अर्ज आयबीएन लोकमतच्या हाती लागली आहेत आणि त्यातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. छगन भुजबळांनी पत्रकार परिषदेत असं भासवलं होतं की समीर भुजबळांची चौकशी फक्त महाराष्ट्र सदनाविषयी सुरू आहे. पण वास्तवात त्यांची चौकशी ही भुजबळ कुटुंबीयांनी स्थापन केलेल्या 11 कंपन्यांविरोधात सुरू आहे. भुजबळ काल (मंगळवारी) असंही म्हणाले होते की, आम्ही ईडीला चौकशीत पूर्णपणे सहकार्य करू, पण सत्यपरिस्थितीत समीर भुजबळ चौकशी सहकार्य करत नसल्याचा ईडीने आरोप केला आहे.

‘ईडी’चे भुजबळांवर आरोप : ईडीच्या रिमांड अर्जातले मुद्दे

– समीर भुजबळांची अटक त्यांच्याच कंपन्यांमधल्या कथित अफरातफरीमुळे
– भुजबळ कुटुंबीयांच्या 11 कंपन्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार ईडीला संशय
– आर्मस्ट्राँग प्युअर वॉटर, आर्मस्ट्राँग एनर्जी, शिराज वाईनयार्ड्स, इदीन फर्निचर
– व्हर्चुअल टूर्स, सुवी रबर, इंटलेक्चुअल मॅनेजमेंट कन्सलटंट्स
– भावेश बिल्डर्स, पर्वेश कन्स्ट्रक्शन, नीश इन्फ्रास्ट्रक्चर, देविशा इनफ्रास्ट्रक्चर
– अटक केल्यानंतरच काही कंपन्यांची कागदपत्रं सुपूर्द केली
– 2 महत्त्वाच्या कंपन्यांची कागदपत्रं अजूनही सुपूर्द केली नाहीयेत
– अनेक कंपन्यांचं वास्तवात काहीच काम नाही, फक्त आर्थिक देवाणघेवाण
– सर्व कंपन्यांमधून अत्यंत क्लिष्ट पद्धतीने पैसे फिरवण्यात आलेत
– महत्त्वाच्या कंपन्यांच्या भागधारक कंपन्या केवळ कागदावरच
– भागधारक कंपन्यांबद्दल काहीच ठाऊक नसल्याचा समीर भुजबळांचा दावा
– समीर भुजबळ चौकशीत सहकार्य करत नसल्याचा ईडीचा आरोप
– समीर भुजबळ जाणीवपूर्वक महत्त्वाची तथ्यं लपवत असल्याचा ईडीचा आरोप
– कोट्यवधी रुपयांची संपत्ती मुळात निर्माण कुठे झाली, हे सांगत नसल्याचा आरोप


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close