संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाला स्थगितीचा निर्णय अखेर रद्द

February 10, 2016 8:10 PM0 commentsViews:

sadasdaspy

मुंबई – 10 फेब्रुवारी : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्थगित करण्याचा निर्णय सरकारने अखेर रद्द केला आहे. तसा नवा आदेशही सरकार काढणार असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

तांत्रिक कारण देत सरकारनं या योजनेला स्थगिती दिली होती. राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता खात्याचे उपसचिव रुचेश जयवंशी यांनी यासंबंधी परिपत्रक काढलं होतं. सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना हे परिपत्रक पाठवण्यात आलं होतं. आर.आर. पाटील ग्रामविकास मंत्री असताना त्यांच्या पुढाकारानं संत गाडगेबाब ग्राम स्वच्छता अभियान सुरू करण्यात आलं होतं.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानमुळे अनेक गावांचा कायापालट झाला. पण 2014-15ची तपासणी झाली नसल्यानं हे अभियान स्थगित नाही, असं कारण यासाठी देण्यात आलं होतं. पण टप्प्याटप्प्यानं ही योजनाच गुंडाळण्याचा डाव असल्याचा आरोप झाला.

वास्तविक संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाला राज्यात उदंड प्रतिसाद मिळत होता, अशात तांत्रिक कारण पुढे करत यंदाच्या वर्षापुरती योजना स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. IBN लोकमतने ही बातमी लावून धरली आणि अखेर सरकारनं स्थगितीचा निर्णय रद्द केला. त्यामुळे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू राहणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close