महिला आरक्षण विधेयकावर मतदान उद्या

March 8, 2010 11:39 AM0 commentsViews: 4

8 फेब्रुवारीमहिला आरक्षण विधेयकावर आता राज्यसभेत उद्या मतदान होण्याची शक्यता आहे. या विधेयकावर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बोलावलेली सर्वपक्षीय नेत्यांची बैठकही आता उद्या होणार आहे. काँग्रेस आणि मित्रपक्षांतर्गत काही खासदारांच्या विरोधामुळे मतदान उद्यावर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. लालू प्रसाद आणि मुलायसिंग यांचा विधेयकाला तीव्र विरोध आहे. काँग्रेस आणि भाजपचा पाठिंबा असला तरी, पक्षातील काही खासदारांचा त्याला विरोध आहे.गोंधळात विधेयक सादर दरम्यान, प्रचंड गदारोळात सरकारने आज महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत सादर केले. पण त्याला समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल यांसारख्या पक्षांच्या सदस्यांनी तीव्र विरोध केला. कायदा मंत्री वीरप्पा मोईली विधेयक सादर करत होते. त्यावेळी या पक्षाच्या खासदारांनी त्यांच्याकडे धाव घेऊन विधेयकाच्या प्रती फाडून टाकल्या. त्यामुळे कामकाज थांबवण्यात आले. पण विधेयकावर सरकार ठाम आहे. दरम्यान लालू प्रसाद यादव आणि मुलायम सिंग यादव यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. महिला आरक्षण विधेयाकावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सर्वपक्षीय नेत्यांना चर्चेसाठी बोलावले आहे.

close