गोरगरिबांच्या आड येणार्‍यांना आडवा केल्याशिवाय राहणार नाही – उद्धव ठाकरे

February 11, 2016 9:45 AM0 commentsViews:

uddhav_thackery_dasara_melava_2015पालघर – 11 फेब्रुवारी : शिवसेना-भाजप सरकार भक्कम असून कोणीही सरकार पाडण्याची वाट पाहू नये असं वक्तव्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसंच गोरगरिबांच्या आड कुणी आलं तर त्याला आडवं करू असा इशाराही त्यांनी दिला. ते पालघर विधानसभेचे युतीचे उमेदवार अमित घोडा यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत बोलत होते.

शिवसेनेची गोर गरीब जनतेशी बांधिलकी असून त्यांच्या न्यायाच्या आड कोणी आलं तर त्याला आडवा केल्या शिवाय राहणार नाही असं या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले. आमचं युती सरकार पडावं म्हणजे आम्हाला परत सत्तेत बसता येईल अस विरोधकांना वाटते. युतीच सरकार हे मजबूत असून लांब गेल्यावर एकमेकांचं महत्त्व कळतं असा टोला उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.

तर अनेक वर्षांपासून मच्छीमार समाजाच्या लोकांना घर आहेत. त्या जागांचे सात बारे मिळत नाही ते लवकरात लवकर सरकार ला द्यायला भाग पाडू असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी मच्छीमारांना दिलं. वाढवण बंदराला सेनेचा विरोध कायम असून लोकांच्या मतांचा आदर करून सरकारने निर्णय घ्यावा असंही उद्धव ठाकरे यावेळी बोलले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close