हेडलीची साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया सुरू

February 11, 2016 10:20 AM0 commentsViews:


david_headley_2611मुंबई – 11 फेब्रुवारी : 26/11 हल्ल्यातील पाकिस्तानचा दहशतवादी डेव्हिड हेडलीची आज (गुरुवारी) पुन्हा साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झालीये. काल बुधवारी एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये तांत्रिक बिघाडामुळे साक्ष होऊ शकली नाही. आज सकाळी पुन्हा एकदा साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झालीये.

आज हेडलीची ही साक्ष नोंदवण्याची तिसरी वेळ आहे. आतापर्यंत हेडलीने काही खळबळजनक माहिती दिली आहे. 26/11 हल्ल्यात हाफिज सईद सूत्रदार असल्याचं हेडलीचं म्हणणं आहे.. तसंच आयएसआयचा या हल्ल्यांमध्ये हात असल्याचीही माहिती त्याने दिलीये, ज्यामुळे तपासाला पुष्टी मिळालीये. त्यामुळे आज हेडली का नवे खुलासे करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close