क्रिकेटमध्येही महिला दिनाचा उत्साह

March 8, 2010 12:09 PM0 commentsViews:

8 फेब्रुवारीजागतिक महिला दिन क्रिकेटमध्येही मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. भारतीय दौर्‍यावर आलेल्या महिला इंग्लंड क्रिकेट टीमने मुंबईत एका आगळ्यावेगळ्या पध्दतीने महिला दिन साजरा केला. भारतीय पारंपारिक पध्दतीने यावेळी या टीमचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले गेले. इंग्लंड टीमने हातावर मेंदी तर काढून घेतलीच पण त्याचबरोबर हात दाखवून आपले भविष्यही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय महिलांचा आवडता असा साजशृंगारही त्यांनी यावेळी करून घेतला. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एमसीए रिक्रिएशन सेंटरद्वारे इंग्लंड टीमसाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

close