उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार ‘मेक इन मुंबई’ कार्यक्रमाचा समारोप

February 11, 2016 4:40 PM0 commentsViews:

fadnavis23

मुंबई – 11 फेब्रुवारी : मुंबईत 13 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी अशा ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे सहभागी होणार आहेत. 15 फेब्रुवारीला होणार्‍या ‘मेक इन मुंबई’ परिसंवादाचा समारोप त्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला दुजोरा दिला आहे.

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये होणार्‍या या महत्वपूर्ण सप्ताहातंर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 15 फेब्रुवारीला संध्याकाळी 4 वाजता बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मैदानावर आयोजित प्रदर्शनातील महाराष्ट्र दालनास ते भेट देणार आहेत. त्यानंतर मेक इन मुंबई चर्चासत्राचा समारोप त्यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. राज्य सरकारने त्यांना निमंत्रण धाडलं असून, त्यांनी होकार कळविला आहे.

येत्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मेक इन इंडिया सप्ताहाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का? याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मुख्यमंत्र्यांनी मात्र राज्य सरकारच्या वतीने उद्धव ठाकरेंना निमंत्रण पाठवून हा तिढा सोडवला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close