हेडलीच्या साक्षीवर आक्षेप घेणं देशविरोधी – मुख्यमंत्री

February 11, 2016 8:15 PM1 commentViews:

fadnavis-l1

नागपूर- 11 फेब्रुवारी : हेडलीच्या साक्षीवर आक्षेप घेणं देशविरोधी असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये व्यक्त केलं आहे.

हेडलीने पाकिस्तानचा दहशतवादात हात असल्याचं उघड केला आहे. पाकिस्तानविरोधातल्या सबळ पुराव्यांना विरोध करणं हे देशविरोधी कृत्य आहे. हेडलीवर संशय घेतला तर त्याचा थेट फायदा पाकिस्तानलाच होईल, असं ते म्हणाले. तसंच, राजकीय स्वार्थातुन असा संशय व्यक्त करणं अयोग्य असल्याची प्रतिक्रियाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Abhijeet Bamnikars

    headly vr evda vishwas kevapasun……??

close