प्रत्येक जिल्ह्यात विज्ञानाच्या प्रयोगशाळा उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

February 12, 2016 8:37 AM0 commentsViews:

cm_fadanvisनागपूर – 12 फेब्रुवारी : राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात आयआयटी मुंबईनं तयार केलेल्या विज्ञानाच्या मॉडेल प्रयोगशाळा निर्माण केल्या जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

पॅरिसमध्ये युनेस्को इथं ज्येष्ठ भारतीय गणितज्ञ आर्यभट्ट यांच्या पुतळयाचे पाच एप्रिलला अनावरण करणार असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितलंय. नागपूरच्या व्हीएनआयटीत रिसर्च फॉर रिसर्जंन्स या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस आणि स्मृती इराणी बोलत होते. देशभरातल्या विद्यापीठातील कुलगुरू या परिषदेसाठी उपस्थित होते. तीन दिवस चालणार्‍या या परिषदेत अनेक रिसर्चवर चर्चसत्र आयोजित करण्यात आले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close