शहीद सुनील सुर्यवंशी यांचं पार्थिव खराब हवामानामुळे आणण्यात अडचणी

February 12, 2016 9:18 AM0 commentsViews:

sunil_suryavanshiसातारा – 12 फेब्रुवारी : सियाचीनमध्ये हिमस्खलनात झालेल्या दुर्घटनेत सातार्‍याचा मस्करवाडीचा जवान सुनील सुर्यवंशींना वीरमरण आलंय. सुनील यांचं पार्थिव आजही त्यांच्या गावी पोहोचणार नाही. खराब हवामानामुळे त्यामध्ये अडचणी येत आहेत. आता मिळालेल्या माहितीनुसार, शहीद सूर्यवंशी यांचं पार्थिव उद्या लेहला आणलं जाण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात सियाचीनमध्ये झालेल्या हिमस्खलनात 10 जवान ढिगाखाली गाडले गेले होते. यात सुनील सुर्यवंशी यांचा समावेश होतो.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close