‘महिलांना आदर द्या’

March 8, 2010 2:14 PM0 commentsViews: 3

8 फेब्रुवारी'जंटलमेन्स गेम' असे क्रिकेटचे वर्णन केले जाते. विक्रमवीर, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने हे वर्णन सार्थ ठरवले आहे. क्रिकेटर्सना खेळाबरोबर सौजन्याचेही धडेही लहानपणीच मिळावेत, समाजात वावरताना महिलांचा आदर करावा अशी अपेक्षा सचिनने व्यक्त केली आहे.महिला दिनाचे निमित्त साधून त्याने यासाठी मुंबईतील 25 क्रिकेट कोचना पत्रे लिहिली आहेत. क्रिकेटच्या शॉट्ससोबतच मुलांना स्त्री दाक्षिण्यही शिकवावे. आणि मुलींशी नम्रपणे बोलायला शिकवावे, असे पत्रातून सचिनने सुचवले आहे. इंटरनॅशनल सेंटर फॉर रिसर्चऑन वुमन आणि मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन यांनी संयुक्तपणे राबवलेल्या परिवर्तन या उपक्रमाअंतर्गत सचिनने हे पत्र लिहिल आहे.

close