पुण्यातील आर्मी इन्स्टीट्युटची रेकी केली होती, हेडलीचा खुलासा

February 13, 2016 1:51 PM0 commentsViews:

headley_pune_Armyपुणे – 13 फेब्रुवारी : 26/11 हल्ल्यातल्या आरोपी डेव्हिड हेडलीनं आज आपल्या साक्षीत नवे खुलासे केले आहबे. हल्ला झाल्यावर मार्च 2009 मध्ये मी पुण्यात होतो. तिथे मी इंडियन आर्मी इन्स्टीट्युट ची पाहणी केली आणि त्याचे व्हिडिओही काढले होते असा खुलासा केलाय.

पुण्यातल्या आर्मी इन्स्टीट्युटच्या परिसरात लष्कराच्या दक्षिण भागाचं मुख्यालय असल्यामुळे आयएसआयच्या मेजर इक्बालनं त्याची रेकी करण्यासाठी मला सांगितलं होतं, अशी कबुली हेडलीनं दिली. पुण्यातल्या सूर्या व्हिला हॉटेलमध्ये मी 16 आणि 17 मार्च 2009 या दरम्यान मी थांबलो होतो, असं तो म्हणाला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close