रेगे सातत्याने भेटला, ‘बाला अँड सन्स’नावाने पाठवले ई-मेल, हेडलीचा नवा खुलासा

February 13, 2016 4:31 PM0 commentsViews:

headley_regeमुंबई – 13 फेब्रुवारी : हेडलीला आपण फक्त एकदाच भेटलो असा दावा करणार राजाराम रेगे यांचा दावा खुद्द डेव्हिड हेडलीने खोटा ठरवलाय. आपण राजाराम रेगेला सात्यत्याने भेटलोय आणि त्याने बाला अँड सन्स नावाने मेल सुद्धा केला असा खुलासा हेडलीने केलाय.

डेव्हिड हेडलीची आजही साक्ष नोंदवण्यात आलीये. शुक्रवारी शिवसेना भवन लष्कर ए तोयबाच्या रडारवर होतं आणि सेनाभवनाची रेकी करण्यासाठी राजाराम रेगे या व्यक्तीला भेटलो असा खुलासा हेडलीने केला होता. आज पुन्हा एकदा याबद्दल उलट तपासणी करण्यात आली तेव्हा त्याने राजाराम रेगे हा सातत्यानं संपर्कात होता. रेगेने आपल्याला मेल आणि मेसेजेस पाठवल्याचा खुलासा हेडलीनं केलाय. रेगेच्या मेलमध्ये बाला अँन्ड सन्स असा उल्लेख होता. म्हणजेच बाळ ठाकरे आणि त्यांचा मुलगा असा त्याचा अर्थ होता. अशी माहितीही हेडलीने आपल्या साक्षीत दिली आहे.

रेगेचा वापर कसा करता येईल याबद्दल हेडलीनं सातत्यानं लष्कर ए तोयबाच्या लोकांना विचारलं होतं. रेगेच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक मिळावी म्हणून हेडलीने लष्कर-ए-तोयबाच्या लोकांना मेल पाठवल्याचंही त्यानं सांगितलं. लष्करनं रेगेला अमेरिकेत व्याख्यान आणि काँन्फरन्सेसमध्ये बीझी ठेवण्याचा सल्ला हेडलीला दिला होता. त्यामुळे रेगेचा हेडलीला एकदाच भेटल्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. रेगे खोटं बोलतोय का अशीही शंका उपस्थित झालीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close