महिला दिग्दर्शकाला ऑस्कर

March 8, 2010 2:23 PM0 commentsViews: 1

8 फेब्रुवारी 2009चा ऑस्कर सोहळा रंगतदारपणे आज लॉस एंजिलिसच्या कोडॅक थिएटरमध्ये पार पडला. पण यावेळेच्या ऑस्कर सोहळ्यात एक महत्वपूर्ण घटना घडली. द हर्ट लॉकर या सिनेमासाठी कॅथरीन बिजेलोला बेस्ट डिरेक्टरचा ऑस्कर ऍवॉर्ड मिळाला. ऑस्कर ऍर्वार्डच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याच महिलेला दिग्दर्शनासाठी ऑस्कर मिळाले नव्हते. कॅथरीनने मात्र जागतिक महिला दिनाच्या दिवशीच हा मानाचा पुरस्कार पटकावला. ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदाच पूर्वाश्रमीचे नवरा बायको बेस्ट डिरेक्टरच्या स्पर्धेत आमने सामने होते. कॅथरीनचा पूर्वाश्रमीचा नवरा जेम्स कॅमरूनला अवतार या सिनेमासाठी ऑस्करमध्ये बेस्ट डिरेक्टरचे नॉमिनेशन होते. पण जेम्सला नमवत कॅथरीन बिजेलोलानेच बाजी मारली.

close