काश्मीर : कुपवाडामध्ये चकमकीत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान, 2 जवान शहीद

February 13, 2016 4:42 PM0 commentsViews:

kupwara3काश्मीर – 13 फेब्रुवारी : काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात लष्करानं 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं, पण दुदैर्वानं यात आपले 2 जवान शहीद झाले. एक जवान आणि एक लष्करी अधिकारी यात जखमी झाले आहे. शुक्रवारपासून ही चकमक सुरू आहे.

चौकीबल भागातल्या मरसारी गावात ही चकमक सुरू आहे. गावातल्या एका घरात दहशतवादी लपले आहे अशी माहिती लष्कराला मिळाली. त्यानंतर लष्कराने घटनास्थळाचा ताबा घेतला. जवानांनी घर उघडायचा प्रयत्न केला तेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत 4 दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलाय. अजूनही जवान या गावात दबा धरून आहे. लष्करानं अख्खं गाव सध्या सील केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close