देशासाठी लढलेले माजी सैनिक जेएनयू प्रकरणामुळे दुखावले, दिला ‘पदवीवापसी’चा इशारा

February 13, 2016 5:35 PM0 commentsViews:

jnu_4235234नवी दिल्ली – 13 फेब्रुवारी : नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी नारे दिल्याप्रकरणी आता काही निवृत्त लष्करी अधिकार्‍यांनी ठाम भूमिका घेतली आहे. आम्ही देशासाठी लढलो, त्याग केला त्यामुळे अशा घोषणा सहन करू शकत नाही, जर हे वेळीच थांबलं नाहीतर आम्ही आमच्या पदव्या परत करू अशा इशारा निवृत्त अधिकार्‍यांनी दिलाय.

राष्ट्रीय संरक्षण ऍकादमीच्या माजी सैनिकांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र पाठवले आहे. हे सर्व अधिकारी 54 व्या बॅचचे विद्यार्थी आहे. युनाइटेड फ्रंट ऑफ एक्स-सर्व्हिसमॅनचे निवृत्त कर्नल अलिल कौल यांनी हे पत्र लिहिले आहे. जून 1978 बॅचच्या एनडीएचे आम्ही माजी विद्यार्थी असून सायन्स आणि ऑर्टसची पदवी घेतलीये.

पण, जेएनयूमध्ये अफजल गुरू दिवस सारखे प्रश्न हाती घेऊन राष्ट्रविरोधी कृत्य केली जात आहे हे अत्यंत धक्कादायक आहे. भारतविरोधी घोषणाबाजी करणार्‍या विद्यार्थ्यांवर कारवाई केली नाही, आणि हे उद्योग बंद केले नाहीत तर आम्ही आमच्या जेएनयूच्या पदव्या परत करू, असा इशारा या अधिकार्‍यांनी दिलाय. आम्ही ज्या देशासाठी लढलो, त्याग केला, त्या देशाविरोधातल्या घोषणा आम्ही ऐकू शकत नाही, आम्हाला ते सहन होत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close