नक्षलवाद्यांची धमकी झुगारली

March 8, 2010 3:26 PM0 commentsViews: 1

8 फेब्रुवारीनक्षलवाद्यांच्या धमकीला झुगारून देऊन पोलीस भरतीसाठी तरुणांनी गडचिरोलीत मोठी गर्दी केली. आज 38 हजार उमेदवारांनी या भरतीला हजेरी लावली. या भरतीला विरोध करत नक्षलवाद्यांनी त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी कोरची तालुक्यात बेलगाव इथे झाडे तोडून वाहतूक अडवली. काल रात्रीपासूनच नक्षलवाद्यांच्या या कारवाया सुरू होत्या. तरीही तरुणांनी या भरतीला उत्स्फूर्त दिला.

close