‘व्हॅलेंटाईन डे’चा विरोध म्हणून बजरंग दलाने लावलं गाढवाचं लग्न!

February 14, 2016 11:54 AM0 commentsViews:

bajrangi bhai

नागपूर – 14 फेब्रुवारी :  नागपूरात गाढवाचे लग्न लावून वरात काढत ‘व्हॅलेंटाईन डे’चा बजरंग दलाने विरोध केला आहे. व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला इशारा रॅली काढल्यानंतर आज सकाळी गाढवाचं लग्न लावून तरुण-तरुणींनी व्हॅलेंटाईन डे साजरा करू नये असं आवाहनही बजरंग दलानं केलं.

गेल्या काही वर्षांपासून व्हॅलेंटाईन डेच्यानावाखाली हिडीस प्रकारांना ऊत आला असून प्रेमाच्या नावाखाली उघड्यावर युगुलांचे चाळे सुरू असल्याचे दृश्य अनेक ठिकाणी दिसत असल्याचे सांगत बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व्हॅलेंटाईनडेला विरोध करत आहेत असे बजरंग दल स्थानिक नेत्यांनी सांगितले. त्यामुळे आज व्हॅलेंनटाईन डेला बजरंग दलाने गाढवांचं लग्न लावून विरोध केला.

यावेळी ढोल ताशांसह वरातही काढून बडकस चौकात फिरवण्यात आली. दरम्यान आज अंबाझरी, बॉटनिकल गार्डन, फुटाळा तलाव, तेलंखेडी उद्यान परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close