महिला आरक्षणाला मनसेचा पाठिंबा

March 9, 2010 8:06 AM0 commentsViews: 4

9 फेब्रुवारीमहिला आरक्षणाला मनसेने पाठिंबा दिला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत घोषणा केली. फक्त आरक्षण मिळाल्यानंतर तुम्हीच कारभार करा, नवर्‍याला कारभार करू देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले. यापुढील काळात पक्षासाठी मराठीचाच मुद्दा महत्वाचा असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. तर पक्षाला मिळालेल्या यशाचे श्रेय त्यांनी मराठी माणसाला दिले. तसेच यावेळी त्यांनी मीडियाचेही आभार मानले. गेल्या चार वर्षात मनसेने अनेक आंदोलने केली. पण उत्तर भारतीयांच्या विरोधातील मनसेचे आंदोलन चांगलेच चर्चेत आले. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विभानसभा निवडणुकीतही मनसेला चांगले यश मिळाले. लोकसभेत जरी मनसेचा एकही उमेदवार निवडून जाऊ शकला नसला तरी विधानसभेत मात्र पक्षाचे 13 आमदार निवडून आले.

close