वेस्ट इंडिजने जिंकला अंडर 19 वर्ल्डकप!

February 14, 2016 4:33 PM0 commentsViews:

wi-story_647_021116065344

ढाका – 14 फेब्रुवारी : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने तीन चेंडू आणि पाच गडी राखून भारतावर विजय मिळवत  स्पर्धेचे जेतेपद पटकावलंय. भारताच्या खलील अहमदच्या चेंडूवर एक धाव घेत पॉलने वेस्ट इंडिजच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. वेस्ट इंडिजने पहिल्यांदाच अंडर 19 वर्ल्डकप पटकावला.

पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने 45.1 षटकांत 145 धावा केल्या होत्या. भारताचे 146 धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिजने 49.3 षटकात पार केलं. भारतीय फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरलं. भारताकडून केवळ सरफराज खानने 51 धावांची खेळी केली. तर वेस्ट इंडीजकडून जॉन आणि जोसेफने प्रत्त्येकी तीन-तीन विकेट घेतल्या. पॉल आणि कार्टीने सहाव्या विकेटसाठी नाबाद 69 धावांची भागादीरी रचून वेस्ट इंडिजला पहिले वहिले अंडर 19 वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवून दिले. कार्टीने नाबाद 52 आणि पॉलने नाबाद 40 धावांची खेळी केली. लक्ष्य तुटपुंजे असूनही भारतीय गोलंदाजांनी संघर्ष केला पण कार्टी आणि पॉलने त्यांना यशस्वी होऊ दिले नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close