‘व्हॅलेन्टाइन्स डे’च्या पार्टीत तरुणीवर बलात्कार

February 14, 2016 8:00 PM0 commentsViews:

rape dsngfsdg

पुणे – 14 फेब्रुवारी :  व्हॅलेंटाईन डेला पुण्यामध्ये गालबोट लागलं आहे. हडपसरमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या पार्टीमध्येच तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. रविवारी पहाटे ही घटना घडली.

पी़डित तरुणी कोलकाताची असल्याची माहिती आहे. व्हॅलेंटाईन डेच्या पार्टी निमित्त पीडिता मित्रासोबत गेली होती. त्यावेळी मित्रासोबत आलेल्या तरुणाने बलात्कार केल्याचा आरोप आहे. हडपसर पोलिसांनी आरोपी फिरोज शेखला अटक केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close