‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात आग: आग विझवण्यात यश

February 14, 2016 9:09 PM0 commentsViews:

najkasjdhajs

मुंबई – 14 फेब्रुवारी : गिरगाव चौपाटी इथे सुरू असलेल्या ‘मेक इन इंडिया’च्या स्टेजला भीषण आग लागली असून अख्खा स्टेज आगीत जळून खाक झाला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवील, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मेक इन इंडिया अंतर्गत मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर सुरू असलेल्या ‘महाराष्ट्र रजनी’च्या सेटवर आगीची ही घटना घडली आहे. लावणीचा कार्यक्रम सुरू असतानाच स्टेजच्या खाली ही आग लागली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांसारखे अनेक दिग्गज उपस्थित होते.

अभिनेत्री पूजा सावंत सेटवर लावणी सादर करत असतानाच मंचाच्या खालील बाजूने आग लागली. त्यानंतर संपूर्ण सेटवर आगीने अक्राळविक्राळ रुप धारण केलं. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी हा सेट डिझाईन केला होता. काहीच वेळापूर्वी अमिताभ बच्चन यांचा कार्यक्रम सादर झाला होता. आमीर खान, हेमा मालिनी, विवेक ओबेरॉय, श्रेयस तळपदे, इशा कोपीतकर, यासारखे अनेक लहानमोठे कलाकार उपस्थित होते.

अग्निशमन दलाच्या 16 गाड्यांसह 10 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचं नेमकं कारण अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close