गोंधळ घालणारे खासदार निलंबित, तिढा कायम

March 9, 2010 8:11 AM0 commentsViews: 6

9 फेब्रुवारीमहिला आरक्षण विधेयक मांडताना गोंधळ घालणार्‍या 7 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. पण या खासदारांनी राज्यसभा सोडायला नकार दिला. आणि त्यांनी राज्यसभेतच धरणे आंदोलन सुरू केले.निलंबित खासदार पुढीलप्रमाणे- कमाल अख्तर (समाजवादी पार्टी) सुभाष यादव (राष्ट्रीय जनता दल)इजाझ अली (संयुक्त जनता दल)नंदकिशोर यादव(समाजवादी पार्टी)शाबीर अली (अपक्ष)विरपाल सिंगतिढा कायम, गोंधळ सुरूमहिला आरक्षण विधेयकाचा तिढा आजही कायम आहे. आज दुसर्‍या दिवशीही विरोधकांनी राज्यसभेत आणि लोकसभेत कामकाज सुरू होऊ दिले नाही. दोन्ही सभागृहांचे कामकाज आज दोन वेळा स्थगित करावे लागले. लालूप्रसाद, मुलायम आणि शरद यादव हे विरोधावर ठाम आहेत. तर काँग्रेसही आपल्या मतांवर ठाम आहे.पंतप्रधानांशी चर्चा केल्यानंतर, लालूप्रसाद यादव यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली. तसेच आपण आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले. तर चर्चेची तयारी दाखवल्याबद्दल मुलायमसिंग यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.संसदेबाहेर निदर्शनेदुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी आज संसदेच्या बाहेर निदर्शने केली. महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणार्‍यांच्या विरोधात त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.

close