शहीद शंकर शिंदे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

February 15, 2016 12:45 PM1 commentViews:

vlcsnap-2016-02-15-09h08m34s237

चांदवड – 15 फेब्रुवारी : काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्यांशी लढताना वीरमरण आलेले जवान शंकर शिंदे यांच्या पार्थिवावर आज (सोमवारी) सकाळी साडेअकरा वाजता चांदवड तालुक्यातल्या भायळे या त्यांच्या गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलं.

शनिवारी कुपवाडय़ात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये तब्बल 18 तास चाललेल्या चकमकीत 5 दहशतवादी ठार झाले. तर, दोन जवान शहीद झाले. त्यात भायळे इथल्या शंकर शिंदे आणि कर्नाटकच्या विजापूर इथल्या सहदेव मोरे या जवानांचा समावेश होता. रविवारी सायंकाळी शंकर यांचं पार्थिव ओझर विमानतळावर आणण्यात आलं. नंतर देवळाली कॅम्प येथे लष्करी अधिकार्‍यांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांचे पार्थिव मूळगावी दाखल झाले. शिंदे यांच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. त्यांना अखेरचा सलाम करण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक भायळे इथे मोठया संख्येने उपस्थित होते.  शंकर शिंदे अमर रहेच्या घोषणा देत उपस्थित नागरिकांनी आपल्या शूर वीराला निरोप दिला.

शिंदे यांच्या पश्चात पत्नी सुवर्णा, सहा वर्षाची मुलगी, दिड वर्षाचा मुलगा अस कुटुंब आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Ganesh N. Jadhav, Nashik

    भारतमातेच्या ह्या रक्षणकर्त्याला माझा खुप खुप सलाम!!

    Real Hero of India

close