‘मेक इन इंडिया’च्या ‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रमात नेमकं काय झालं?

February 15, 2016 10:18 AM1 commentViews:

मुंबई – 15 फेब्रुवारी : ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत गिरगाव चौपाटीवर काल (रविवारी) ‘महाराष्ट्र रजनी’चा कार्यक्रम सुरू असताना, स्टेजच्या खाली रात्री 8.20च्या सुमारास अचानक आग लागली. बघता बघता वार्‍यामुळे ही आग भडकली आणि संपूर्ण स्टेजसह अख्खा स्टेज जळून खाक झाला. स्टेजवरच्या कलाकारांना आणि प्रेक्षकांनाही ताबडतोब सुरक्षित चौपाटीबाहेर काढण्यात आल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

‡ÝÖßÖ êÖêáÖÏÖê

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत गिरगाव चौपाटीवर रविवारी ‘महाराष्ट्र रजनी’मध्ये अभिनेत्री पूजा सावंत हिचे लावणी नृत्य सुरू असताना, स्टेजखाली आग लागल्याचं लक्षात आलं. त्यानंतर स्टेजवरच्या कलाकारांना लगेचच स्टेजवरून खाली उतरवण्यात आलं. चौपाटीवरच्या वार्‍यामुळे आग भडकत असतानाच, प्रेक्षकांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर चार बंबांनी आग विझवायला सुरुवात केली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या एकूण 14 गाड्या आणि 10 पाण्याचे टँकर्सनी प्रयत्नांची शर्थ करून सुमारे दीड तासांच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली.

दरम्यान, या आगीमध्ये महाराष्ट्र रजनीचा सेट भस्मसात झाला. ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या उत्सवी वातावरणाला गालबोट लागलं. मालमत्तेचंही प्रचंड नुकसान झालं. पण सुदैवाने या सर्व घटनेत कुणालाही इजा झाली नाही. तसंच अगदी कमी वेळेत मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाने जी कामगिरी केली त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Ashok Patil

    PURA MAHARASHTR DUSHKALANE PETAT ASATANA MAKE IN INDIACH DAMDAULACHI KALANE HIRAVUN NELA. NAHITAR HE SARKAR KAY KAMACH ? MHAISAL YOJANECHE PANIHI DEVU SHAKAT NAHIL….

close