कार्यकर्ते पक्षश्रेष्ठींवर नाराज

March 9, 2010 8:54 AM0 commentsViews: 1

विनय म्हात्रे, नवी मुंबई नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी जवळ जवळ नक्की झाली आहे. असे असले तरी दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मात्र आघाडीच्या या निर्णयामुळे पक्षश्रेष्ठींवर नाराज आहेत.नवी मुंबई महापलिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार नाही असे गृहीत धरुन दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते कामाला लागले. पण आघाडीचा निर्णय हा पक्षश्रेष्ठी लादत असल्याचे दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांना वाटत आहे. पण ते उघडपणे ते बोलू शकत नाहीत.आघाडीबाबतचा निर्णय दिल्ली पातळीवरच झाल्याने या निर्णयामध्ये कोणीच जास्त ढवळा ढवळ करु शकत नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नवी मुंबई काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी केलेल्या बंडखोरीचा राग राष्ट्रवादी विसरायला तयार नाही. विरोधकांपेक्षा बंडखोर काँग्रेस नेत्यांनीच राष्ट्रवादाला टार्गेट केले होते.आघाडी आता जवळ जवळ निश्चित झाली आहे. पण स्थानिक पातळीवर आघाडीच्या वाटाघाटी कोण करणार हा प्रश्न आहे. आता दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमधील नाराजी दूर करण्याचे आव्हान पक्षश्रेष्ठींसमोर आहे. नाहीतर याचा फटका निवडणुकीत बसू शकतो.

close