मेक इन इंडियाचे कार्यक्रम ठरल्याप्रमाणेच – मुख्यमंत्री

February 15, 2016 11:54 AM0 commentsViews:

CM in meeting

मुंबई – 15 फेब्रुवारी : गिरगाव चौपाटीवरची ‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रम सुरू असताना काल (रविवारी) लागलेल्या आगीची घटना दुदैर्वी असून या घटनेचा ‘मेक इन इंडिया’च्या नियोजित कार्यक्रमांवर कोणताही परिणाम होणार नाही. सर्व कार्यक्रम ठरल्याप्रमाणेच होतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

‘मेक इन इंडिया’ अंतर्गत गिरगाव चौपाटीवर काल (रविवारी) ‘महाराष्ट्र रजनी’चा कार्यक्रम सुरू असताना, रात्री 8.20च्या सुमारास स्टेजच्या खाली अचानक आग लागली. बघता बघता वार्‍यामुळे ही आग भडकली आणि संपूर्ण स्टेजसह अख्खा सेट जळून खाक झाला. त्यानंतर प्रसारमध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.

आगीची घटना दुदझ्वी आहे. अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम सुरू असताना, अचानक स्टेजला आग लागली, असं त्यांनी सांगितलं. चार दिवसांपूर्वी फायर ऑडिट केलं होतं. तसंच आपत्कालीन आराखडा तयार असल्याने कलाकार आणि सर्व प्रेक्षकांना सुरक्षित बाहेर काढता आलं. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, आगीचे कारण अद्याप समजले नाही. या आगीच्या कारणांची सक्षम अधिकार्‍यांमार्फत चौकशी होईल. तसंच ‘मेक इन इंडिया’च्या नियोजित कार्यक्रमांवर कोणताही परिणाम होणार नाही. सर्व कार्यक्रम ठरल्याप्रमाणेच होतील, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close