एपीएलला मोठा प्रतिसाद

March 9, 2010 9:06 AM0 commentsViews:

9 फेब्रुवारीशेखलाल शेख, औरंगाबादसलग तिसर्‍या वर्षी सुरू असलेली लोकमत औरंगाबाद प्रीमिअर क्रिकेट लीग स्थानिक खेळाडूंसाठी मोठी संधी निर्माण करणारी ठरली आहे. या स्पर्धेतील प्रत्येक मॅच अतिशय रंगदार होत असून, प्रेक्षकांचा या स्पर्धेला पहिल्या मॅचपासून मोठा प्रतिसाद लाभला आहे.औरंगाबाद प्रीमिअर क्रिकेट स्पर्धेतील प्रत्येक मॅच ही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळवल्या जाणार्‍या मॅच सारखीच रंगत आहे. 15 ओव्हरच्या या मॅचमध्ये फोर आणि सिक्सची आतषबाजी होत आहे.यात स्थानिक खेळाडूंना आपली कामगिरी दाखवण्याची संधी मिळाली आहे. स्पर्धेत चांगली कामगिरी करणारे हे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर खेळण्याचे स्वप्न पाहू लागले आहेत. स्पर्धेत चांगली कामगिरी करणार्‍या खेळाडूंना मोठी बक्षीसेही दिली जातात. मॅन ऑफ द मॅच खेळाडूला खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते रोख पारितोषिक दिले गेले. खेळाडूंसाठी ही स्पर्धा भविष्यात चांगली संधी असल्याचे विजय दर्डा यांनी यावेळी सांगितले.औरंगाबाद प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत या वर्षी 8 टीमचा समावेश आहे. 11 मार्चला या स्पर्धेची फायनल मॅच होणार आहे. त्यामुळे स्पर्धेची फायनल गाठण्यासाठी सर्व टीममध्ये जोरदार चुरस रंगली आहे.

close