टाॅप10 अस्वच्छ शहरात कल्याण-डोंबिवली तर स्वच्छ शहरात मुंबई 10 व्या नंबरवर

February 15, 2016 5:45 PM0 commentsViews:

kdmcमुंबई – 15 फेब्रुवारी : देशातील स्वच्छ आणि अस्वच्छ शहरांची यादी जाहीर झाली आहे. या यादीत महाराष्ट्र खूपच तळाला आहे.
स्वच्छ शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवड नवव्या, तर मुंबई दहाव्या स्थानावर आहे. तर अस्वच्छ शहरांच्या यादीत कल्याण-डोंबिवली शहर देशात दहावं आहे.

स्वच्छ शहरांच्या यादीत पहिल्या क्रमाकांचा मान कर्नाटकातील म्हैसूर शहराला मिळाला आहे. या यादीत पंजाब, हरियाणामधील चंदीगड दुसर्‍या तर तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली हे तिसर्‍या क्रमांकावर आहे.

केंद्रीय शहर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांची घोषणा केली. अस्वच्छ शहरांच्या यादीत धनबाद सर्वात पहिला आहे. एकूण अशा 73 शहरांच्या स्वच्छ आणि नियोजनला यात रँकिंग देण्यात आलीये.

देशातील ही आहेत टॉप10 स्वच्छ शहरं

1) म्हैसूर- कर्नाटक
2) चंदिगड
3) तिरुचिरापल्ली – तामिळनाडू
4) नवी दिल्ली म्युनिसिपल काउन्सिल, राजधानी
5) विशाखापट्टणम
6) सुरत- गुजरात
7) राजकोट- गुजरात
8) गंगटोक- सिक्कीम
9) पिंपरी-चिंचवड महाराष्ट्र
10) मुंबई – महाराष्ट्र

 ही आहेत टॉप 10 अस्वच्छ शहरं

1) धनबाद
2) आसनसोल
3) इटानगर
4) पटना
5) मेरठ
6) रायपूर
7) गाझियाबाद
8) जमशेदपूर
9) वाराणसी
10) कल्याण डोंबिवली


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close