उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी काढला एकत्र सेल्फी

February 15, 2016 7:32 PM0 commentsViews:

cm_uddhav_selfiyमुंबई -15 फेब्रुवारी : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र मॅग्नेटीक महाराष्ट्र मधील एमटीडीसीच्या दालनात सेल्फी काढला. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मोबाईलने हा सेल्फी फोटो काढलाय. या सेल्फी फोटोत दोन्ही नेत्यांनी हाताच्या मुठी आवळून आपण एकत्रच असल्याचे दाखवून दिलंय.

सत्तेत एकत्र युतीचं सरकार असूनही भाजप आणि शिवसेना यांच्यात सतत तू तू मै मै सुरू होती. मेक इन इंडियाच्या कार्यक्रमातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर उद्धव ठाकरेंना निमंत्रण नव्हतं. त्यामुळे शिवसेना नाराज होती. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षातील कटुता काहीशी या सेल्फी फोटो काढून दूर करण्याचा प्रयत्नं मुख्यमंत्र्यांनी केलांय. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या सेल्फी फोटोसाठी शिवसेना स्टाईल आक्रमक फोटो पोझ दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close