दिल्ली विद्यापीठातील प्रा. एस ए आर गिलानींना अटक

February 16, 2016 9:32 AM0 commentsViews:

Geelani1

नवी दिल्ली – 16 फेब्रुवारी : देशद्रोहाच्या आरोपाखाली दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक एस ए आर गिलानी यांना अटक करण्यात आली आहे. प्रेस क्लबमध्ये देशविरोधी घोषणाबाजी केल्याने दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

संसद मार्ग पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी प्राध्यापक गिलानींना ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केल्यानंतर पहाटे 3 च्या सुमारास पोलिसांनी त्यांना अटक केली.

दिल्ली प्रेस क्लबमधील एका कार्यक्रमात गिलानी यांनी देशविरोधी भाषण ठोकलं होतं. काश्मीरच्या स्वातंत्र्याचे नारे त्यांनी दिले होते आणि अफझल गुरू, मकबूल बट्ट यांचा उल्लेख शहीद असा केला होता. त्यानंतर, गिलानींविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. संसद मार्ग पोलिसांनी या प्रकरणी विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक अली जावेद यांची तीन वेळा चौकशी केली. अली जावेद यांच्यासह प्रेस क्लबचे ऑफिस सेक्रेटरी जितेंद्र सिंह यांचाही जबाब नोंदवण्यात आला. त्यात, गिलानी आणि त्यांच्या साथीदारांनी भारतविरोधी घोषणा दिल्याचं स्पष्ट झालं होतं.

दरम्यान संसद हल्ला प्रकरणीही गिलानींना अटक करण्यात आली होती. पण पुराव्यांअभावी हायकोर्टानं त्यांना निर्दोष मुक्त केलं होतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close