रशियातील मेडिकल अकॅडमीत आग; महाराष्ट्रातील 2 विद्यार्थीनींचा मृत्यू

February 16, 2016 10:33 AM0 commentsViews:

Raussia;kjd
रशिया – 15 फेब्रुवारी : रशियाच्या स्मोलेन्स्क मेडिकल अकॅडमीत लागलेल्या आगीमध्ये महाराष्ट्रातील 2 विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन या घटनेची माहिती दिली आहे. या दोन्ही मुली नवी मुंबई आणि पुण्यातील आहे.  तसंच परराष्ट्र विभागाची टीम घटनास्थळी पोहचली आहे.

रशियाची राजधानी मॉस्को पासून सुमारे 400 किलोमीटर अंतरावर स्मोलेन्स्क मेडिकल अकॅडमी आहे. या अकॅडमीच्या होस्टेलच्या चौथ्या मजल्यावर रविवारी रात्री अचानक आग लागली. याच मजल्यावर नवी मुंबईतील पूजा कल्लूर, आणि पुण्यातील करिष्मा भोसले या दोघी एकाच खोलीत राहत होत्या. या दोघी रशियाच्या स्मोलेन्स्क मेडिकल अकॅडमीत एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात शिकत होत्या. आगीमुळे या दोघींना खोलीच्या बाहेर पडता आले नाही. आग आटोक्यात आणल्यानंतर अग्निशमन दलाचे त्यांच्या खोलीत पोहचले. त्यावेळी दोघी मृतावस्थेत आढळल्या.

दरम्यान, आगीमुळे झालेल्या धुरात गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या दोघींचे मृतदेह स्थानिक हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आलं असून पोस्टमॉर्टेमचे रिपोर्ट आल्यानंतर दोघींचे मृतदेह भारतात पाठवण्यात येईल. विद्यापीठातील सुत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही मुलींचे पालकांना आणि भारतीय दूतावासातील अधिकार्‍यांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

दोन्ही विद्यार्थिनींचे मृतदेह मंगळवारपर्यंत मॉस्कोत आणले जातील आणि त्यानंतर मुंबईला हलवण्यात येतील. तसंच या आगीमध्ये आणखीन काही विद्यार्थी जखमी झालं असून ते धोक्याबाहेर आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close