पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या अमित घोडांचा दणदणीत विजय

February 16, 2016 1:14 PM0 commentsViews:

Palghar12

पालघर – 16 फेब्रुवारी : पालघर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अमित घोडा यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. अमित घोडा यांनी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गावितांचा 22 हजार मतांनी पराभव केला.

आमदार कृष्णा घोडा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यात शिवसेनेच्यावतीने कृष्णा घोडा यांचे चिरंजीव अमित घोडा, तर काँग्रेसतर्फे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्यात मुख्य लढत झाली. आज झालेल्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासून अमित घोडा यांनी आघाडी घेतली. ती शेवटपर्यंत कायम ठेवली. अखेर 22 हजारांहून अधिक मतांनी अमित यांनी दणदणीत विजया मिळवून पालघरवर भगवा फडकावला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close