जेएनयू घोषणाबाजी प्रकरणाच्या एनआयए चौकशीस दिल्ली हायकोर्टाचा नकार

February 16, 2016 2:29 PM0 commentsViews:

Delhi High court

दिल्ली – 16 फेब्रुवारी : जेएनयूमधील देशविरोधी घोषणाबाजी प्रकरणी हस्तक्षेप करण्यास दिल्ली हायकोर्टाने नकार दिला आहे. आम्ही काय उतावीळ राजकीय नेते आहोत का? असे ताशेरे ओढत या प्रकरणी एनआयएद्वारे चौकशीची मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.

दिल्ली पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि घटनेच्या मुळाशी जावं. ही घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे एवढ्या लवकर अशा याचिकेवर सुनावणी होऊ शकत नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं. तसंच या प्रकरणाची दिल्ली पोलीस चौकशी करण्यास सक्षम असल्याचा विश्वासही दिल्ली हायकोर्टाने व्यक्त केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close