फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांची दप्तरेच जप्त

March 9, 2010 11:59 AM0 commentsViews: 2

9 फेब्रुवारीपरीक्षा फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांची दप्तरेच जप्त केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातील राठी मराठी माध्यमिक विद्यालयात हा प्रकार घडला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून शाळेत प्राथमिक परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा शालाबाह्य असूनही ती सर्व विद्यार्थ्यांना बंधनकारक करण्यात आली. या परीक्षेसाठी 220 रुपये एवढी फी आकारण्यात आली होती. पण वारंवार सांगूनही विद्यार्थ्यांनी ही फी भरली नाही, म्हणून शाळेच्या प्रशासनाने त्यांच्याकडची दप्तरे काढून घेतली. शाळेचा हा प्रकार म्हणजे हुकूमशाही असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. दरम्यान, मनविसेच्या पदाधिकार्‍यांनी याप्रकरणी प्राचार्यांना घेराव घातला आणि विद्यार्थ्यांची दप्तरे परत करण्यास शाळा प्रशासनाला भाग पाडले.

close