जेएनयूचे विद्यार्थी माओवादी संघटनेत सहभागी -रवींद्र कदम

February 16, 2016 5:32 PM0 commentsViews:

नागपूर – 16 फेब्रुवारी : जेएनयू आणि दिल्ली विद्यापीठांतील काही विद्यार्थी माओवादी कारवायांमध्ये सामिल आहेत अशी धक्कादायक माहिती पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम यांनी दिली आहे.

kadam_jnuप्राध्यापक साईबाबाने या विद्यार्थ्यांना माओवादाकडे वळवल्याचंही कदम यांनी सांगितलं. या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांचा एक गट माओवादी समर्थक असल्याचंही ते म्हणाले. प्राध्यापक साईबाबा हा माओवादी होता याबद्दल आम्ही कोर्टात पुरावे दिली असून आणखी तपास सुरू आहे. या तपासात साईबाबा हा डेमोक्राटीक स्टुडंट युनियनच्या घनिष्ठ संपर्कात होता. त्याच्या संस्कारातून जेएनयूचे काही विद्यार्थी माओवादी संघटनेत सहभागी झाले असा दावाही कदम यांनी केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close