भायखळ्याजवळ लोकलच्या धडकेत मुलाचा मृत्यू

February 16, 2016 5:32 PM0 commentsViews:

bhyakhala_train_Accident3मुंबई -16 फेब्रुवारी : सँडर्हस्ट रोड ते भायखळा दरम्यान रेल्वे स्टेशन दरम्यान रूळ ओलांडताना एका 13 वर्षांच्या मुलाला आपला जीव गमवावा लागलाय. संतप्त प्रवाशांनी काही वेळे रेल्वे रोको आंदोलन केलं होतं. त्यामुळे काही काळ मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. आता ती पूर्वपदावर आलीये.

सँडर्हस्ट रोड ते भायखळा दरम्यान पादचारी पूल नसल्यामुळे स्थानिकांना रेल्वे रुळ ओलांडावा लागतो. आज सकाळी 11 च्या सुमारास 13 वर्षी गौरव व्होरा घरी परतत असतांना सँडर्हस्ट रोड ते भायखळा रुळ ओलांडताना या मुलाला ट्रेनची धडक लागली. यात गौरव जखमी झाला त्याला तातडीने सेंट जार्ज रुग्णालयात दाखल कऱण्यात आले असता मयत घोषित केलं. दरम्यान, या प्रकारामुळे संतप्त स्थानिक रेल्वे ट्रॅकवर उतरले. त्यामुळे काही लोकल सेवा विस्कळीत झाली होती. रेल्वे प्रशासनाने मध्यस्थी केल्यामुळे स्थानिकांनी आंदोलन मागे घेतले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close