शेतकर्‍यांना खुशखबर, आता शेतीमाल विका थेट ग्राहकांना !

February 16, 2016 6:35 PM0 commentsViews:

faramre33316 फेब्रुवारी : शेतकर्‍यांसाठी एक आनंदाची बातमी…आता शेतकर्‍यांना शेतीमाल थेट ग्राहकांना विकता येणार आहे. बाजार समितीतर्फेच शेतीमाल विकण्याची सक्ती उठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केलीये.

आतापर्यंत शेतकर्‍याला शेतीमाल विकायचा असेल तर बाजार समितीतर्फे विकणं बंधणकारक होतं. मात्र, आता शेतकरी आपला माल थेट ग्राहकांना विकू शकतो. त्यामुळे शेतकर्‍याला चांगला भावही मिळणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने धोरणात्मक बदल घडवले आहे. या निर्णयामुळे आता शेतकर्‍यांना आपला माल थेट बाजारपेठेत मर्जीप्रमाणे विकता येणार आहे. आतापर्यंत शेतकर्‍यांना आडते आणि दलालांच्या मार्फत आपला माल विकावा लागत होता. त्यामुळे हवी ती रक्कम शेतकर्‍यांच्या पदरात पडत नव्हती या निर्णयामुळे बळीराजाला आपल्या मेहनतीचा किंमत स्वत :चा ठरवता येणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close