वाशिमचा चिमुरडा ‘गुगल बॉय’, काय पण विचारा उत्तर बिनचूकच !

February 16, 2016 8:33 PM0 commentsViews:

मनोज जयस्वाल, वाशिम – 16 फेब्रुवारी : वाशिम जिल्ह्यात सध्या सगळ्यांच्या तोंडावर नाव आहे ते प्रणव मोरे या अवघ्या अडीच वर्षांच्या मुलाचं…अडीच वर्षांच्या प्रणवला सध्या लोक गुगल बॉय म्हणून ओळखतात. कोण आहे हा प्रणव ?

pranava_more2323हा आहे वाशिम जिल्ह्यातला गुगल बॉय…प्रणव मोरे…वय 2 वर्षं 4 महिने…या वयातल्या मुलांना जे प्रश्न कळणारही नाहीत त्याची उत्तर प्रणव चुटकीसरशी देतो. राष्ट्रपती, पंतप्रधान ते गावचा पोलीस पाटील काहीही विचारा…सारंकाही बिनचूक…इतकंच नाही तर अगदी स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी,त्यांची नावं आणि पदंही तो क्षणात सांगतो. बाराखडी, एबीसीडी, इंग्रजी कविता हे तर त्याला तोंडपाठच आहे. म्हणूनच त्याला नाव मिळालंय गुगल बॉय.

घरची बेताची परिस्थिती आहे. आई-वडील मोलमजुरी करतात. आपल्या मुलानं शिकावं आणि तल्लख बुद्धीमत्तेच्या जोरावर यश मिळवावं अशी त्यांची इच्छा आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close