फरासखाना स्फोट प्रकरणी 4 दहशतवाद्यांना अटक

February 17, 2016 1:34 PM0 commentsViews:

êËÖêŸÖ¸êüË

17 फेब्रुवारी : ओडिशातील रुरकेलामध्ये सिमी या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या 4 संशयित दहशतवाद्यांना आज (बुधवारी) सकाळी अटक करण्यात आली. या चौघांचाही पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्याबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात यांचा सहभाग असल्याची माहिती एटीएसनं दिली आहे.

एटीएसनं दिलेल्या माहितीनुसार, ओडिशा, तेलंगण पोलीस आणि गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांनी संयुक्तरित्या कारवाई करत या चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. यांच्यासोबत एका महिलेलाही अटक करण्यात आली आहे. सिमीशी संबंधित असलेले हे चौघेजण चार-पाच वर्षांपासून इथे राहत होते. कारवाईदरम्यान यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही याला चोख प्रत्युत्तर दिले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close